तुझ्यावर लिहीन म्हणतोय..
कविता तुझ्यावर लिहीन म्हणतोय,
होशील माझी या आशेने..
प्रत्येक पानांवर कोरेन म्हणतोय,
माझ्याच लेखणीच्या साक्षीने..
शब्दांचा डाव मांडेन म्हणतोय,
तुझ्या होकाराच्या जोरावर..
कागद, शाई संपवेन म्हणतोय,
कधी लिहिण्यासाठी वाळूवर..
प्रेमात अस गरजेचं असत का,
व्यक्त होण्यासाठीच लिहिणं-बिहिणं..
की त्या पलीकडे फक्तच उरेल,
कधी अर्धवट कविता, कधी माझं पाहणं..
No comments:
Post a Comment