Oct 19, 2010

मी नेहमीच रिमझिम बरसतो...
आणि तुला सादही घालतो...
तू एकदा तरी बघशील म्हणून...
तुझ्या अंगणभर परसतो...

मला ठाऊक आहे...
तुझं मला वळून वळून बघणं...
ओठांवर जरी नसलं तरी....
तरी मनात माझं असणं....

आता नका सांत्वन करू...
त्याचा काही उपयोगही नाही...
त्या गोष्ठी मी केव्हाचाच विसरलो...
आता त्याचे दुखं देखील नाही...

तसं सगळ्यांना नाही जमत...
तुझ्यासारखं वागणं...
ओठांवर जरी नसलं...
तरी मनात माझं असणं...

काल तुझी अचानक आठवण झाली...
तू पावसात भिजलेली..
माझी बाजू पूर्ण न ऐकताच....
तू मुक्केपणाने निघून गेलेली....



No comments:

Post a Comment