Feb 25, 2020

उरले फक्त..



उरले फक्त

तुझीच स्पंदने, तुझंच प्रेम, तुझीच आस..
तुझंच हसणं, तुझीच चाहूल आणि तुझाच भास..

तुझंच सर्व काही असून माझे काहीच न उरले..
तुझा विश्वास एवढा त्या श्वासांना, की ते माझे ही न राहिले..

कविता जशी जाहली ही तुझी, पूर्णत्व कधीच न घडणारी..
तू राहिली असशील माझी, तरी ही स्पर्शात नसणारी..

प्रेमातही असेल तसे काही, भेटलो होतो जरी भोवती..
हरवले ते क्षण, ती साथ ही, मात्र आठवणी त्या कायम सोबती..

लिहिले तुला मी डोळ्यांनी, परी उरले ना ते शब्द ही..
न संपणारी तूच "ती" राहिली, बाकी पुसटली ती नजर ही..

तू नाहीस त्या वाटेवर तरीही मी तुला शोधावे..
जाणवेल हे प्रेमही तुला आणि तू ही माझ्यासाठीच बिथरावे..

साथ आली सूर्याची मग, तुझेच ते रूप रंगविले..
पाहून तुला ते किरणं ही मग कवडस्यात लाजले..

निजला चंद्र ही त्या ताऱ्यांच्या कुशीत, आठवणी ही त्या भाळल्या त्या क्षणी..
उरले फक्त काही क्षण आपले, राहिल्या त्या न झेपणार्या आठवणी..

तुझ्यावर लिहीन म्हणतोय..


तुझ्यावर लिहीन म्हणतोय..

कविता तुझ्यावर लिहीन म्हणतोय,
होशील माझी या आशेने..

प्रत्येक पानांवर कोरेन म्हणतोय,
माझ्याच लेखणीच्या साक्षीने..

शब्दांचा डाव मांडेन म्हणतोय,
तुझ्या होकाराच्या जोरावर..

कागद, शाई संपवेन म्हणतोय,
कधी लिहिण्यासाठी वाळूवर..

प्रेमात अस गरजेचं असत का,
व्यक्त होण्यासाठीच लिहिणं-बिहिणं..

की त्या पलीकडे फक्तच उरेल,
कधी अर्धवट कविता, कधी माझं पाहणं..


लिहिलेले प्रत्येक पान मी जपले स्वतःचे..



क्षणासाठी चारोळीत का असेना तुझ्यात देखील माझं अस्तित्व आहे.. ♥️


Jul 31, 2011

निवेदन..!




मी कोणी कवी नाही किंवा लेखक नाही,फक्त एक मराठी कविता आणि लेख प्रेमी आहे त्यामुळे या ठिकाणी पोस्ट केलेल्या कविता / लेख माझ्या असतीलच असे नाही , त्यामुळे त्या-त्या लेखांचे आणि कवितांचे श्रेय मूळ लेखक आणि कवींनाच ….

Oct 19, 2010

तुझं काय ग..
तू येऊन पुन्हा जाशील..
सुखावलेल्या झाख्मांवरच्या खपल्या...
पुन्हा काढून जाशील....

तू दिलेल्या जखमा देखील...

हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....

हल्ली स्वप्नांचं आणि माझं...

तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुद्लंय...

तुला जपतांना हल्ली दुखं..

माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...

किती दा तरी तुला सांगितलं...

सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...

तुझे डोळे रोज सांगतात...

मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....








मी नेहमीच रिमझिम बरसतो...
आणि तुला सादही घालतो...
तू एकदा तरी बघशील म्हणून...
तुझ्या अंगणभर परसतो...

मला ठाऊक आहे...
तुझं मला वळून वळून बघणं...
ओठांवर जरी नसलं तरी....
तरी मनात माझं असणं....

आता नका सांत्वन करू...
त्याचा काही उपयोगही नाही...
त्या गोष्ठी मी केव्हाचाच विसरलो...
आता त्याचे दुखं देखील नाही...

तसं सगळ्यांना नाही जमत...
तुझ्यासारखं वागणं...
ओठांवर जरी नसलं...
तरी मनात माझं असणं...

काल तुझी अचानक आठवण झाली...
तू पावसात भिजलेली..
माझी बाजू पूर्ण न ऐकताच....
तू मुक्केपणाने निघून गेलेली....



चार क्षण तुझ्या आठवणींचे,
माझ्या अंतरंगात ओतलेले,
पराकाष्ठा झाली प्रयत्नांची,
पण ते तेथेच गोठलेले....

वडाच्या परम्ब्याचं..
जमिनीवर प्रेम होत...
त्या दोघांचं मिलन होऊ नये....
म्हणून वडाच
झाड वाडत होत....

पावसात भिजताना...
आश्रू दिसत नसतात...
नुसत्या
भावनेने इथे
दोन मन मिळत नसतात....



Sep 5, 2010


माझी कविता ऐकून कुणीतरी लाजावं...
डोळ्यांच्या कोप्र्यात्न कुणीतरी माझ्याकडेही पाहावं...

मला पाहून कुणाचा तरी हसू फुलावं...

फोनेवर कुणीतरी मलाहि miss you म्हणावं...

मी उशिरा आलो म्हणून कुणीतारीही चिडावं....

माझ्याशी भांडून कुणीतारीही रडावं.....

मलाही वाटतं कुणीतरी आपलंसं असावं...



माझी
girlfriend
म्हणून कॉलेजात दिमाख्यात मिरवावं...
बाईकच्या मागे बसून तिला ऐटीत फिरवावं...
लपून कुणीतरी माझ्याकडेही पाहावं...
कधी गाडीत बसून longdrive वर निघून जावं...
दुरत्या डोंगरावर जाऊन मावळत्या सूर्याला पहावं...
मलाहि वाटत कुणीतरी आपलंसं असावं...
क्लासचा बहाना करून picture ला निघून जावं...
आणि त्या टीकेत खिडकीवर जाऊन कॉर्नेर्च ticket मागावं....
कॉलेजचा बहाना करून पिकनिक ला निघून जावं..
तिचा हाथ हातात घेऊन त्या अथांग सागराकडे पहातच राहावं....
मलाही वाटतं कुणीतरी आपलंसं असावं...
valentine 's day ला तिच्यासाठी गिफ्ट घ्यावं....
चांगल्याश्या हॉटेल मध्ये candle light dinner करावं....
त्या मंद प्रकाशात तिचा ते सौंदर्य पाहावं....
सार्या जगाला विसरून तिच्यातच बुडून जावं...

romantic music लावून तिला जवळ घ्यावं....

मनातला सार काही तिच्या कानात सांगावं....
मला.....मला हि वाटत कुणीतरी आपलंसं असावं....
छोटसं स्वप्ना हे माझा कधीतरी पूर्ण व्हावं...
उभ्या आयुष्यात कुणीतरी मलाही आपलंसं म्हणावं...
खंर...मलाहि वाटत कुणीतरी आपलंसं असावं...
.
सागर.....

Aug 21, 2010

तू गेलीस म्हणून थाम्ब म्हणालो नाही...
का जाशी हे ही सांग म्हणालो नाही...
होतीस जरी बाजुस उभी तू माझ्या...
हे अंतर आहे लाम्ब नाही

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती...
घन ओले की नजरच ती ओली होती
निपटून काढता डोल्यान्मदले पाणी...
जाफिटले सारे पांग म्हणालो नाही